Anil Deshmukh and Nawab Malik Sarkarnama
मुंबई

Anil Deshmukh On Malik Bail: मलिकांना जामीन मंजूर होताच अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, 'महाराष्ट्रातच नाही तर...'

Anil Deshmukh : "राजकारणासाठी ईडीच्या चौकशा लावल्या जात आहेत, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मलिकांच्या तब्येतीचा विचार करून दोन महिन्यांसाठी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करत मलिकांना मोठा दिलासा दिला.

मलिकांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया देत सुप्रीम कोर्टाने मलिकांचा जामीन मंजूर केला, ही आमच्यासाठी आनंदाची बातमी असल्याचे सांगत सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

"सध्या राजकारणासाठी ईडीच्या चौकशा लावल्या जात असून महाराष्ट्रातच नाही तर देशभरात यंत्रणांचा दुरुपयोग करून खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत", असा गंभीर आरोप अनिल देशमुखांनी सरकारवर केला. शुक्रवारी माध्यमांशी बोलतांना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

मुंबईतील कुर्ला या ठिकाणी गोवावाला कंपाऊंडच्या जागेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मलिकांवर करण्यात आला होता. याच प्रकरणात नवाब मलिकांना ईडीने अटक केले होते. फेब्रुवारी 2022 पासून मनी लाँडरिंग प्रकरणी मलिक तुरुंगात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मलिक आजाराने त्रस्त असल्याने प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळण्यासाठी मलिकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर कोर्टाने मलिकांना जामीन मंजूर केला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT