Nawab Malik and Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Nawab Malik Bail: मलिकांना जामीन मंजूर होताच रोहित पवारांचे ट्विट; 'या' विरोधात लढण्याचा केला निर्धार

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला. मलिकांना जामीन मंजूर होताच आमदार रोहित पवार यांनी समाधान व्यक्त करत मलिक यांच्या आरोग्याची काळजी करत एकाधिकारशाहीच्या विरोधात लढू या, असे ट्विट करत निर्धार व्यक्त केला.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिक एक वर्षांपासून अधिक काळ कोठडीत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांचे तब्येत व्यवस्थित नसल्याने ते उपचार घेत होते. या पार्श्वभूमीवरच उपचारासाठी त्यांना दोन महिन्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला.

नवाब मालिकांना जामीन त्यांच्या आजाराच्या उपचारासाठी मिळाला असला तरी राजकीय वर्तुळात या घटनेकडे सत्तेची गोळा-बेरीज या अनुषंगाने पाहिले जातेय का, अशी परिस्थिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांनी मलिकांना जामीन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात सामील होणात यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत "उशिरा का होईना साहेब आपल्याला न्याय मिळाला, तब्येतीची काळजी घ्या, आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र लढूया!", असे म्हटले आहे.

दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मलिक यांना जामीन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत ते जेष्ठ अनुभवी नेते आहेत, ते योग्य निर्णय घेतील, असे म्हंटले आहे. त्यामुळे आता नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT