Bala Nandgaonkar, Bhagat Singh Koshyari
Bala Nandgaonkar, Bhagat Singh Koshyari sarkarnama
मुंबई

Bhagat Singh Koshyari :' साठी बुद्धी नाठी' ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल..; नांदगावकरांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

Bhagat Singh Koshyari : आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर चौफेर टिका होत आहेत. (bhagat singh koshyari controversial statement over shivaji maharaj)

"छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण ते जुन्या काळात," असं कोश्यारी म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे हे चांगलेच संतापले आहेत.

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या या विधानावर राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे,

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी टि्वट करुन राज्यपालांचा समाचार घेतला आहे, ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यानी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे,"

महाराष्ट्रातून परत पाठवा-गजानन काळे

"कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा," अशी मागणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे. राज्यपालांनी सुधारायच नाही असं ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळत नाही तिथं का ज्ञान पाजळता? गडकरीजी, पवारसाहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा. पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा, असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

सन्मानाने बोललं पाहिजे-उदय सामंत

शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच आराध्य दैवत आहेत. राज्यपाल यांनी वक्तव्य काय केल हे माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबद्दल बोलताना आदराने आणि सन्मानाने बोललं पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT