Uddhav Thackeray & Nihar Thackeray, Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray & Nihar Thackeray, Eknath Shinde Latest News Sarkarnama
मुंबई

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवानेच पुरवली मुख्यमंत्री शिंदेंना रसद...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील सत्तासंघर्षावर आज (ता.२७) सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली असून सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली असून शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिल्याने आता पक्षचिन्ह, आणि खरी शिवसेना कुणाची? हा निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे न जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. तर शिंदे गट यासाठी आग्रही होता. मात्र याप्रकरणी शिंदे गटाची बाजू लढविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी रसद पुरविली आहे. या निर्णयावर निहार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Uddhav Thackeray & Nihar Thackeray, Eknath Shinde Latest News)

निहार ठाकरे म्हणाले की, जेव्हा आपण एकनाथ शिंदेंना भेटलो तेव्हा त्यांना म्हटले की, तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालल्याने आपला तुम्हाला पाठिंबा आहे. शिंदेंच्या बाजुने आम्ही आमची बाजू मांडली असून न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजाला परवानगी देखील दिली आहे. येथील लढाई देखील आम्ही नक्कीच जिंकू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढे निहार म्हणाले की, आमच्याकडे बहुमत असून सुमारे ८० टक्के आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी आमच्याकडे असून कुणाला मुदत द्यायची की नाही हा निर्णय निवडणूक आयोग घेईल. मात्र त्यांना आणखी मुदत मिळेल, असे वाटत नाही. त्यांनी सर्व दाखल करायला हवे होते. आम्ही याबाबत दीड लाख अफिटेव्हिट आयोगाकडे दिल्याचेही निहार ठाकरेंनी स्पष्ट केले.

तसेच, धनुष्यबाण चिन्ह हे कुणाला मिळेल यावर बोलतांना ते म्हणाले की, ज्या गटाकडे बहूमत असते त्याच गटाचा पक्ष मानला जाते. याबाबत आयोगाची तारीख लवकर जाहीर होण्यासाठी पत्र लिहिणार आहोत. तसेच आपण राजकारणात येण्याचा विचार केला नसल्याचेही त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, निहार हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ सुपूत्र दिवंगत बिंदू माधव ठाकरे यांचे पूत्र असून ते सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. विशेष म्हणजे ते शिंदे गटाच्या वकिलांच्या पॅनलमध्ये आहेत. यामुळे त्यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT