Balasaheb Thorat|
Balasaheb Thorat|  
मुंबई

रामशास्त्री आता जागा झाला; बाळासाहेब थोरातांचा राज्यपालांचा टोला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदान पद्धतीने व्हायची. पण नाना भाऊंनी राजीनामा दिला आणि आवाज मतदान हे आम्ही लोकसभा पद्धतीने केलं. उच्च न्यायालयाने हे मान्य केलं पण सुप्रीम कोर्टाने आपल्याजवळ ठेऊन घेतलं. त्यानंतर आतापर्यंत झोपलेल्या राज्यपालांचा रामशास्त्री जागा झाला, आतापर्यंत झोपलेले होते. त्यांनी आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीला परवानगी दिली, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यापालांवर निशाणा साधला.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिंदे भाजप गटाने बहुमत मिळवले आणि राहुल नार्वेकरांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडे 164 आमदारांचं बहुमत असल्याचे सिध्द झाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सरकारने 164 चा आकडा गाठला. या निवडणुकीनंतर विरोधीपक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन केले.

''विधानसभेला अध्यक्षांचा मोठा इतिहास आहे.मुख्यमंत्र्यांच्या पाट्या नसतील पण आतापर्यंत झालेल्या सर्व विधानसभा अध्यक्षांच्या पाट्या आहेत. विधानसभा अध्यक्षपदी अनुभवी सदस्यांची नेमणूक करण्याची परंपरा आहे. पण सर्वांत तरुण वयातले अध्यक्ष म्हणून तुमचं नाव राहिल. अध्यक्ष हा निरपेक्ष असावा सर्वांना समान वागणूक देणारा असावा. तुमची जवळीक सर्वांना माहिती आहे. आदित्य ठाकरेंना तुम्ही कायदा शिकवला, अजित दादांनीही तुमच्याबद्द्ल सांगितलं मग तुम्ही कॉंग्रेसच बाजूला का ठेवली,'' अशी मिश्लिल टीप्पणीही त्यांनी केली.

''देवेंद्रजींनी एका दगडात किती पक्षी मारले हे मला समजलचं नाही. बुद्धिबळ खेळत आपले लक्ष नव्हते असे वाटले. अनेक कायद्याच्या लढाया लढल्या जातील महाराष्ट्रातील जनतेचे हित साधले जावे,'' असंही त्यांनी म्हटलं. राज्याचा विकास करायचा असेल आणि चालना द्यायची असेल तर असेल तर सभागृह हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण दुर्दैवाने या सर्व सभासदांना कोरोना संकटामुळे पाहिजे तेवढी संधी मिळाली नाही ही वस्तुस्थितीत आहे. जे काही दिवस मिळाले त्यात त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण आता सभागृहात त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT