Balasaheb Thorat Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thorat News : काँग्रेस विधानसभेत नवीन गटनेता नेमणार? बाळासाहेब थोरात जबाबदारीतून...

Congress News : राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Congress News : राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आहे. त्यातच पक्षाचे ज्येष्ट नेते आणि काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात आपल्या गटनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची शक्याता आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीच आपणास गटनेते पद नको असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्या जागीही नवीन नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे. ते कर्नाटमध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रिपदही मिळाले आहे. आता त्यांच्या जागी महाराष्ट्र काँग्रेसला (Congress) नवे प्रभारी देखील मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये बदलाचे वारे असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रामध्ये अगामी काही दिवसांमध्ये अनेक निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थासह, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र (Maharashtra) काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच पटोले यांना पक्षांतर्गत विरोध वाढल्याचे सांगितेल जात आहे. विशेष करुन विधान परिषद निवडणुकीत आमदार सत्यजीत तांबे यांच्या तिकिटाच्या वेळी मोठे नाट्य रंगले होते. तेव्हापासून काँग्रेसमध्ये सगळे काही अलबेल नसल्याची चर्चा आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT