Sushma Andhare  Dombivli
Sushma Andhare Dombivli Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare यांच्या वक्तव्याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक; दिली थेट डोंबिवली बंदची हाक

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी संत-महंतांबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ उद्या (दि.१७) बाळासाहेबांच्या शिवसेनेने डोंबिवली बंदची हाक दिली आहे. तर सुषमा अंधारे यांचे संत-महंतांबद्दल केलेल्या विधानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. तरी देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि वारकरी संप्रदाय तसेच डोंबिवलीतील काही व्यापारी संघटना आणि काही रिक्षा संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. तर काही संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहीर केलेला नाही.

डोंबिवलीमध्ये वारकरी संप्रदाय तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेने अंधारेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी बंदची हाक दिलीय. याबाबत डोंबिवली (Dombivli) शिवसेना (Shiv Sena) मध्यवर्ती शाखेत शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी भागवताचार्य महंत बाळकृष्ण पाटील, ह.भ.प. प्रकाश म्हात्रे, वारकरी संप्रदाय ठाणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प चेतन म्हात्रे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दिपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, राजेश कदम, महेश पाटील, राजेश मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाविषयी केलेल्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामध्ये सुषमा अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानांवरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत तो व्हिडिओ जुना असल्याचं सांगत त्यांनी वारकरी संप्रदायाची माफीही मागितली. मात्र तरी देखील वारकरी संप्रदाय त्यांच्याविषय आक्रमक झाला आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीवर संतांचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही. याचा निषेध करण्यासाठी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली असल्याचे यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले. तसेच संतांविषयी अंधारे यांनी केलेले वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करणार असल्याचे ह.भ.प.पाटील यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT