मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बीकेसी मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, सून आणि नातू उपस्थित राहिले. यामुळे माध्यमांमध्ये या गोष्टीची जोरदार चर्चा झाली. बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे, सून स्मिता ठाकरे आणि नातू निहार ठाकरे हे एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहिले. यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेंना एकटं पडू देवू नका. त्यांना एकनाथ राहू द्या. शिंदेंशाही आली पाहिजे.
"आम्ही ठाकरे म्हणजे काही लिखीत घेऊन येत नाही. एकनाथ शिंदे माझ्या खूप आवडीचा आहे. मुख्यमंत्री झाला आहे. मला आता एकनाथराव बोलावं लागेल. पाच सहा दिवस झाले. मला एक एक फोन येत होते. विचारत होते की, तुम्ही शिंदे गटात गेला का? हा ठाकरे कुणाच्या गोटात बांधला जात नाही. शिंदे यांनी दोन चार भूमिका मला आवडल्या. असा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवा आहे. त्यामुळे मी म्हणूनच शिंदेंच्या प्रेमासाठी आलो आहे, असे जयदेव ठाकरे म्हणाले.
आपला इतिहास आहे. चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि मध्यंतरीचा एकनाथ... त्यांना जवळच्यांनीच संपवलं. यांना एकटं पाडू नका. हा एकटा नाथ होऊ नका... हा एकनाथचं राहू द्या... ही तुम्हा सर्वांना विनंती आहे, सर्व बर्खास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या. राज्यात पुन्हा शिंदे राज्य येऊ द्या, असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले. असेही जयदेव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले, मराठी अस्मितेसाठी, मराठी बाण्याचे तेज राखण्यासाठी, हिंदुत्वाचा अमुल्य ठेवा जपण्यासाठी… आपण भेटतोय बीकेसी मैदानावर. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा,'' टीझर शेअर केला आहे. चलो बीकेसी हा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.