Sunetra Pawar along with Parth Pawar and Jay Pawar during a political meeting discussing Baramati by-election strategy and future leadership plans. Sarkarnama
मुंबई

NCP Politics : बारामतीचे मतदान उरकताच सुनेत्रा पवारांनी दोन्ही लेकांवर टाकली मोठी जबाबदारी; जय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

Pawar Family Politics 2029 : एकीकडे पवार कुटुंबियांमध्ये २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून फूट पडणार की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे पोटनिवडणुकीचं मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षासाठी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 24 Apr : बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता.२४) मतदान पार पडलं. या मतदानादरम्यानच, जय पवार यांनी २०२९ मध्ये बारामती विधानसभेसाठी मी उमेदवार व्हावे, अशी कार्यकर्त्यांची आणि लोकांची मागणी असल्याचं वक्तव्य केलं.

जय यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी देखील २०२९ च्या बारामती विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असं वक्तव्य केलं.

या दोघांच्या वक्तव्यामुळे एकीकडे पवार कुटुंबियांमध्ये २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून फूट पडणार की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे पोटनिवडणुकीचं मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षासाठी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तीन टप्प्या वाटप केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार आता पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभरात फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहणार आहेत. तर राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्याकडे पक्ष संघटनेची दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसंच जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पातळीवर अनेक घडामोडी सुरू असल्याचं दिसत आहे.

कारण सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवारांना बाजुला सारून काही नेत्यांना पक्षाची सूत्रे आपल्या ताब्यात घ्यायचे असल्याचे आरोप केले जात आहेत. अशातच आता पक्षावर आपली पकड मजबूत रहावी यासाठी राष्ट्रवादीची सर्व सूत्रे आपल्या कुटुंबाच्याच हातात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवाय अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र पार्थ आणि जय हे दोघेही राजकारणात सक्रिय झाले आहेत. पार्थ पवार राज्यसभेवर गेलेत तर इकडे जय पवारांनी कालच २०२९ ला बारामती विधानसभेसाठी मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी राजकारण सोपं व्हावं यासाठी दोन्ही मुलांना आपापल्या कार्यक्षेत्रात लक्ष देण्यासाठी या जबाबदाऱ्यांचं वाटप केल्याचंही बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT