Illegal Crop Insurance Sarkarnama
मुंबई

Illegal Crop Insurance : अवैध पीक विमा मोठी कारवाई; मंत्री धनंजय मुंडेंच्या परळीसह राज्यात 96 सीएससींचे आयडी ब्लाॅक

Beed Minister Dhananjay Munde Parli illegal crop insurance state : राज्यात पीक विमा पडताळणी राज्य आणि परराज्यातील अवैध पीक विमा भरणाऱ्या आयडी ब्लाॅक करण्यात आले आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : प्रधानमंत्री विमा योजना खरीप हंगाम 2024 मध्ये पीक विमा पोर्टलवर बोगस विमा भरण्याचा प्रकारावर भाजप आमदार सुरेश धस चांगलेच आक्रमक आहे. याबाबत त्यांनी सभागृहात देखील आवाज उठवला होता. यावर आता कृषी संचालनायलाकडून कारवाई सुरू आहे.

राज्यासह परराज्यातील अवैध पीक विमा भरणारे 96 सीएससींचे आयडी ब्लॉक करण्यात आले आहे. यात बीड जिल्ह्यातील 35 सीएससींचे आयडी असून, त्यात तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील 22 सीएससींचे आयडी ब्लाॅक करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मंत्री मुंडे यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

शेत जमिनी दाखवून काहींनी बनावट पीक विमा भरल्याचे प्रकारावर तक्रारी झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका मतदारसंघातील भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील उचलून धरला होता. अवैध पीक विमा हा मोठा झोल आहे, असा गंभीर आरोप करत त्यांनी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यावर भेट घेत, लक्ष वेधले होते. यानुसार आता कृषी संचालनालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बीडमध्ये (Beed) सरकारी जमीन शेत दाखवून काहींनी बनावट पीक विमा भरल्याचे प्रकार झाले. यानंतर राज्यभरातील पीक विमा पडताळणीला सुरवात करण्यात आली. राज्यातील इतर जिल्ह्यातही, अवैध पीक विमा भरण्याचे प्रकार आढळले. बीड जिल्ह्यात बनावट पीक विमा भरणारे 35 सीएससीधारक आहेत. त्यापैकी 22 जणांचे सीएससी आयडी परळी शहर आणि तालुक्यातील आहेत. अंबाजोगाईतील सहा, बीडमधील एक आणि इतर सहा आयडीधारक हे इतर तालुक्यांतील असल्याचे समोर आली आलं आहे.

परभणी जिल्ह्यात खोट्या कागदपत्रांद्वारे बोगस पीक विमा भरला गेला होता. कोणतेही भौगोलिक क्षेत्र अस्तित्वात नसताना तेथे खोटे सातबारा, आठ (अ) सारखे महसुली अभिलेख तयार करून एकूण 96 सीएससी आयडीधारकांच्या आयडीमधून पीक विमा नोंदणी करण्यात आली. यातून सरकारची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे 96 सीएससी आयडी ब्लॉक करण्याची सूचना कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी सीएससी कंपनीला केली आहे.

परराज्यातील सीएससीधारक ब्लाॅक

महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे सात सीएससीधारक हे इतर राज्यांतील आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील दोन, बंदा जिल्ह्यातील अत्तारा येथील एक , हरदोई जिल्ह्यातील दोन, तर हरयाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील दोन यांचा समावेश आहे.

लाखांपेक्षा जास्त पीक विमा प्रस्ताव रद्द

बनावट पीक विमा भरणाऱ्या लोकांचे विमा प्रस्ताव विमा कंपनीने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास एक लाखापेक्षा अधिक विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. आणखी काही बनावट प्रस्ताव असतील तर रद्द केले जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT