SC Hearing On Shivsena
SC Hearing On Shivsena  Sarkarnama
मुंबई

Security At Shivsena Bhavan: न्यायालयाच्या निकालाआधी मातोश्री, शिवसेनाभवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस फार महत्वाचा ठरणार आहे. गेल्या ११ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर आज (दि.११) निकाल दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे गटाकडून आपल्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, एकीकडे न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.याचवेळी मातोश्री, शिवसेना, सामनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या निकाल पुढील काही मिनिटातच लागणार आहे. या निकालाचे मोठे परिणाम राज्याच्या राजकारणासह देशपातळीवर होणार आहे. यामुळे राज्यासह दिल्लीतही अनेक घडामोडी घडत आहे. उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray) च घर असलेलं मातोश्री या निवासस्थाना बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

त्याचबरोबर सामना ऑफिस या ठिकाणी खासदार संजय राऊत उपस्थित असल्यामुळे या ठिकाणी देखील मोठा पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला आहे. तर शिवसेनाभवन(Shivsena bhavan) याठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

तसेच ठाकरे गटाकडून दुपारी मातोश्रीवर उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत आमदार, पदाधिकारी यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी निकाल विरोधात लागला तर नेमका काय निर्णय़ घ्यायचा यावर पक्षाची पुढील दिशा ठाकरे हे आपल्या नेतेममंडळींसह ठरविण्याची शक्यता आहे. याचवेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक होवून काही अनुचित प्रकार उडवू शकतात. यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत.

सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस हे न्यायालयाच्या शिंदे आणि त्यांच्या १६ अपात्र आमदारांवरील निर्णय़ भाष्य करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT