raj_thakrey_
raj_thakrey_ 
मुंबई

बेस्टने घेतली मनसेची धास्ती, बस गाड्यांना बसवल्या जाळ्या

मिलिंद तांबे

मुंबई  : राज ठाकरेंच्या 'ईडी' प्रकरणा विरोधात मनसे आक्रमक झाली असून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफाड होण्याची शक्‍यता असल्याने बस गाड्यांना संरक्षक जाळ्या बसवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.बेस्ट कामगारांचं संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन ही खबरदारी घेतल्याचं सांगत मनसेचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचा बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी 'ईडी' कार्यालयात चौकशी होणार आहे.मनसे कार्यकर्ते यामुळे आक्रमक झाले असून त्यांच्याकडून उग्र आंदोलन होण्याची शक्‍यता आहे.या आंदोलनात मन सैनिकांकडून बेस्ट बस गाड्यांची तोडफोड होण्याची शक्‍यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने बस गाड्यांच्या समोरील काचा आणि खिडक्‍यांना लोखंडी संरक्षक जाळ्या बसवल्या आहेत.

मुंबईतील आंदोलनात बेस्ट बसेसची तोडफोड ही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बेस्ट प्रशासनाला लाखो रुपयांचं नुकसान सोसावं लागतं.मुंबईत गुरुवारी उग्र आंदोलन झालं तर मनसेचा जोर असणाऱ्या दादर, परळ आणि वडाळा परिसरात याचा अधिक फटका बसू शकतो.यामुळे बेस्ट प्रशासनाने दादर,परळ, वडाळा सह कुलाबा मार्गावरील बस गाड्यांना लोखंडी संरक्षक जाळ्या बसवल्या असून या संरक्षक जाळ्या 23 ऑगस्ट पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT