Uddhav Thackeray,Bhagat Singh Koshyari sarkarnama
मुंबई

ठाकरेंच्या या निर्णयावर राज्यपाल पहिल्यांदाच खुषीने सही करणार

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठविलेला मसुदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आज हातावेगळा करण्याची शक्यता आहे.

ज्ञानेश सावंत

मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा टेकू हा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या बळावर असूनही या दोन मित्रांना गुंडाळत विरोधी बाकावरच्या भारतीय जनता पक्षाला धार्जिणी प्रभाग पद्धत करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठविलेला मसुदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आज हातावेगळा करण्याची शक्यता आहे. त्याचे कारणही तसे म्हणजे, ही प्रभाग पध्दत राज्यपालांच्या पक्षाच्या अर्थात भाजपला परवडणारी आहे. एरवी, ठाकरे सरकारच्या निर्णयांवर आढेवेढे घेणारे राज्यपाल कोश्यारी मात्र भलतीच तत्पुरता दाखविणार, हे निश्चित आहे. यानिमित्ताने राज्यपाल, ठाकरे एकत्र यांचीही निराळी 'युती' ही उघड होणार आहे.

प्रभागावरून दोन्ही काँग्रेसच्या रोषाचा अंत न पाहताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी नव्या प्रभाग पद्धतीचा मसुदा राज्यपालांकडे धाडला आणि मित्रपक्षांवरील कुरघोडीचा डावही जिंकला. ठाकरे यांच्या पावलामुळे दोन्ही काँग्रेसचे नेते आणखीच घायाळ होणार असल्याचे स्पष्ट आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीपासून ठाकरे सरकारच्या भूमिकांवर राज्यपाल नेहमीच अडून असल्याचे दिसून आले आहे. अलीकडच्या काळात महिला अत्याचार, त्यासाठीचे विशेष अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसह अन्य महत्त्वांच्या निर्णयावर राज्यपाल कोश्यारी-ठाकरे यांच्यातील संघर्ष पेटला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या कुबड्या घेतल्यानेच शिवसेनेकडे अर्थात, ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले. त्यामुळे सर्वाधिक १०५ आमदार असूनही सत्तेपासून लांब राहिलेल्या भाजपचा थयथयाट सुरूच आहे.

या सत्तासंघर्षातून उभारलेल्या गेलेल्या राजकीय लढ्यात राज्यपालही आघाडीवर असतात. त्यातून १२ आमदारांच्या यादीवर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. त्यापलीकडे, ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांत हस्तक्षेप करीत, एखाद्या विरोधीपक्षासारखेच राज्यापाल तुडून पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यापाल, ठाकरे सरकार यांच्यातील संघर्षाला रोज नवी धार चढते. मात्र, महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रभाग पध्दतीवर महाविकास आघाडीची मोहोर असेल, म्हणजे, या तिन्ही पक्षांच्या सोयीचे प्रभाग राहण्याची शक्यता असतानाही मुख्यमंत्री यांनी मात्र चारऐवजी एक-दोन सदस्यांचा प्रभाग करणे अपेक्षित होते. त्याचा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फायदा होऊन, या तिन्ही पक्षांची ताकद वाढण्याची आशा होती. याच पक्षांच्या मनाप्रमाणे प्रभाग पद्धती ठरण्याचा अंदाज ठाकरे यांनी खोडून काढत, तीन सदस्यांचा प्रभाग केला. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराजी आणि आक्रमक होण्याचा इशारा देऊनही ठाकरे ठाम राहिले आणि मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीत तीनचा प्रभाग कायम ठेवला. त्यानंतर अध्यादेशासाठी तीनच्या प्रभागांचा मसुदा राज्यपालांकडेही पाठविला; या प्रक्रियेत वेळ न दडवता, पुढच्या आणि नेमक्या कार्यवाहीलाही ठाकरे यांनीच वेग दिला आहे. ही संधीच समजून राज्यपालही आता लगेच मसूद्यावर स्वाक्षरी करणार असल्याचे स्पष्ट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT