Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra  Sarkarnama
मुंबई

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या यात्रेत अपघात ; तामिळनाडूमधील एकाचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो

Bharat Jodo Yatra :काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील नवीन मोंढा परिसरात राहुल गांधी यांची काल रात्री सभा झाली. नांदेड येथून ही यात्रा आज हिंगोली येथे येत आहे.या यात्रेदरम्यान अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर झाला आहे. या दोघांना आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. (Bharat Jodo Yatra latest news)

गणेशन (वय ६२) यांचा मृत्यू झाला आहे. तर आणि सययुल (वय ३०) हे गंभीर झाले आहेत. हे दोघेही तामिळनाडू येथील रहिवाशी आहेत. या दोघांना ट्रकने धडक दिली. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गणेशन यांचे निधन झाले. तर सययुल याच्यावर उपचार सुरू आहे.

अपघाताचे वृत्त कळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार मोहन हंबर्डे यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. गणेशन यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज पाचवा दिवस आहे. राजकीय नेत्यांसह डॉक्टर, इंजिनिअर, वकील, खेळाडू देखील या यात्रेत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेलामहाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज (शुक्रवारी) यात्रेत सहभागी होणार आहेत, त्यांनी याबाबत काल (गुरुवारी) माध्यमांना ही माहिती दिली आहे. भारत जोडो यात्रा आज हिंगोलीत दुपारी पोहचणार आहे. आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालणार आहेत.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते या यात्रेत सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनाही सहभागी होणार आहेत.

राज्यभरातून कार्यकर्ते राहुल गांधींना साथ देण्यासाठी या यात्रेत सहभागी होणार आहेत.राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील मार्गावर ज्या दोन मोठ्या सभा होणार आहेत, त्यातील पहिली सभा काल (ता.10) नांदेडमध्ये झाली. तर दुसरी सभा 18 नोव्हेंबरला शेगाव येथे होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT