devendra fadnavis sarkarnama
मुंबई

Mumbai BJP : मुंबईतील भाजपच्या तीन आमदारांचं ‘टेन्शन’ वाढलं; पहिल्या यादीतून ‘OUT’, दुसऱ्यात स्थान मिळणार का?

Bjp Candidate List Maharashtra : महायुतीत अद्याप काही जागांवरून पेच कायम आहे. मात्र, भाजपनं पहिली यादी जाहीर करून पहिला क्रमांक पटकवला आहे.

Akshay Sabale

Mumbai News: विधानसभा निवडणुकीत 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून भाजपनं बाजी मारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 मंत्र्यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपनं जाहीर केलेल्या यादीत मुंबईतील 13 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, 3 आमदार अजूनही ‘वेटिंग’वर आहेत. त्यामुळे तीन आमदारांच्या ‘टेन्शन’मध्ये भर पडली आहे.

भाजपनं ( Bjp ) जाहीर केलेल्या पहिल्या यादीत वर्सोवातील भारती लव्हेकर, बोरीवली येथील सुनील राणे आणि घाटकोपर पूर्व येथील पराग शहा यांचा समावेश नाही. त्यामुळे तीनही आमदारांची धडधड वाढली आहे. दुसऱ्या यादीत तीन आमदारांना स्थान मिळते की पत्ता कट होतो, हे पाहावं लागणार आहे.

शेलारांच्या बंधूला तिकीट...

अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत कुलाबातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मलबार हिलमधून कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. त्यासह शेलार यांचे मोठे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विनोद शेलार यांच्यासमोर ‘हॅट्ट्रिक’ मारणारे काँग्रेसचे अस्लम शेख यांचं आव्हान असणार आहे.

कोणाला तिसऱ्यांदा तर कोणाला चौथ्यांदा उमेदवारी...

गोरेगावमधून विद्या ठाकूर, विलेपार्लेमधून पराग अळवणी, कांदिवली पूर्वमधून अतुल भातखळकर, अंधेरी पश्चिममधून अमित साटम, दहिसरमधून मनीषा चौधरी, सायन कोळीवाडा येथून आर. तमिल सेल्वन यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली आहे. भाजपनं चौथ्यांदा योगेश सागर यांना चारकोपमधून उमेदवारी दिली आहे. पराग अळवणी आणि राम कदम ( घाटकोपर पश्चिम ) यांना उमेदवारी मिळणार की तिकीट कापण्यात येणार? अशी चर्चा रंगली होती. मात्र, त्यांना तिकीट मिळालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT