Bhide Guruji met Eknath Shinde; An hour-long discussion in a closed room-ub73
Bhide Guruji met Eknath Shinde; An hour-long discussion in a closed room-ub73 
मुंबई

भिडे गुरुजींनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; बंद खोलीत तासभर चर्चा

सुर्यकांत पवार

कास : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आज शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे (ता.महाबळेश्वर) यागावी जाऊन भेट घेतली. काल खासदार उदयनराजेंनी बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याने राजकिय वर्तूळात खळबळ उडाली आहे. Bhide Guruji met Eknath Shinde; An hour-long discussion in a closed room

खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण व सातारा शहरातील विविध विकासकामांसंदर्भात काल (गुरुवारी) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हाती. लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजी यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीतून काय घडणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. 

याविषयी भिडे गुरुजी यांना विचारले असता त्यांनी भेटीचे कारण सांगण्याचे टाळले. सुमारे तासभर दोघात बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत नेमके काय मुद्दे होते, याची उत्सुकता आता ताणली आहे. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले आहे. बंद खोलीतील चर्चेनंतर मंत्री शिंदे यांच्या शेतात संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते फणसाचे रोप लावण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT