Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
मुंबई

Eknath khadse : दिवाळीनंतर कागदपत्रे मिळणार ; 'या' मुद्द्यांवर खडसेंची पुन्हा फेरतपासणी

सरकारनामा ब्युरो

Eknath khadse : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील नेते तपास यंत्रणाच्या रडारवर आले आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यामागे पुन्हा एका भोसरी भूखंड प्रकरणाचे भूत मागे लागणार आहे.

पुण्यातील भोसरी जमीन खरदी-विक्री प्रकरणाच्या गैरव्यवहाराबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या फेरतपासाचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे खडसेंच्या अडचणींत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंकडे महसुल खाते होते. त्यावेळी खडसे महसुल मंत्री असताना पुण्याजवळील भोसरी येथील एमआयडीसीमधील तीन एकराचा भुखंड खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

भुखंडाची खरेदी त्यांनी पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावे करण्यात आली होती. त्यावेळी भुखंडाचे बाजार भावानुसार मुल्यांकन अधिक असताना ते कमी किंमतीत खरेदी केले. तसेच सरकारची स्टॅम्प ड्यूटीदेखील भरण्यात आली नव्हती, असा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने येथील बंद गार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिल्याचे समजते. याप्रकरणात सरकारच्या वतीने नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.

एकनाथ खडसे यांना 31 जानेवारी 2023 पर्यंत अटक न करण्याची सूचनाही कोर्टाने दिली आहे.न्यायालयाच्या दिवाळी सुट्टीनंतर तपास अधिकाऱ्यांना न्यायालयाकडून भूखंड घोटाळ्याची कागदपत्रे मिळणार आहे. दिवाळीनंतर कागदपत्रं मिळाल्यानंतर भोसरी भूखंड घोटाळ्याचा पुन्हा तपास सुरू होणार आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार ज्या मुद्द्यांवर तपास झाला नाही, त्याचा विचार करून पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याची माहिती, ॲड. अजय मिसर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT