Bhaskar Jadhav News  Sarkarnama
मुंबई

Bhaskar Jadhav : मुंबई तोडण्याचं भाजपचं जुनं षडयंत्र ; भास्कर जाधव संतापले

Bhaskar Jadhav : हे गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठीच षडयंत्र आहे'

सरकारनामा ब्युरो

Bhaskar Jadhav : कर्नाटक-महाराष्ट्रातील वाद दिवसेंदिवस पेटत चालला आहे. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. कर्नाटकात जाण्याची इच्छा महाराष्ट्रातील काही गावांनी व्यक्त केल्यानंतर आता सीमालगतची काही गावातील नागरिकांनी तेलंगणा, गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. कांदिवली येथील मालवणी महोत्सवात सिंधुदुर्गातील आरवलीच्या वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी जाधव आले होते. तेव्हा त्यांनी यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. मनसेच अध्यक्ष राज ठाकरे, राधाकृष्ण विखेपाटील यांच्यावरही जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला.

भास्कर जाधव म्हणाले, "महाराष्ट्रातील काही गाव कर्नाटकात चालली आहेत. काही गाव गुजरातेत चालली आहेत. त्यांना दाखवायचे आहे. कर्नाटक ,गुजरातमध्ये राज्य भाजपचं आहे, तिकडे खूप मोठा विकास झाला आणि महाराष्ट्राचा विकास झाला नाही. हे गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठीच षडयंत्र आहे'

"कर्नाटक ,गुजरातमध्ये राज्य भाजपच आहे, तिकडे खूप मोठा विकास झालाय आणि महाराष्ट्राचा विकास झाला नाही. हे गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठीच षड्यंत्र आहे. मराठी माणसासाठीच नाही तर मुंबई महाराष्ट्रात ठेवायची की नाही याच्यासाठी हातवर करा," असे आवाहन भास्कर जाधव यांनी केलं.

महाराष्ट्राचे लचके तोडायचे..

"भाजप महाराष्ट्राचे लचके तोडायचे काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची भाजपमध्ये स्पर्धा चालली आहे. मुंबई काबीज करण्याच भाजपचं जुनं स्वप्न आहे. महाराष्ट्रातील काही गाव कर्नाटकात चालली आहेत. काही गाव गुजरातेत चालली आहेत. त्यांना दाखवायचे आहे," अशी टीका त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT