CM Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : चांदिवलीत राडा! संतापलेले CM शिंदे थेट काँग्रेसच्या कार्यालयात शिरले, VIDEO आला समोर

Maharashtra Vidhan Sabha Election: मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील सभा संपवून परत निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहून एका व्यक्तीने अपशब्द वापरल्यामुळे मोठा राडा झाला आहे. या व्यक्तीचे अपशब्द ऐकू येताच मुख्यमंत्री थेट काँग्रेस कार्यालयात धावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 12 Nov : मुंबईतील चांदिवली (Chandivali) विधानसभा मतदारसंघातील सभा संपवून परत निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाहून एका व्यक्तीने अपशब्द वापरल्यामुळे मोठा राडा झाला आहे. या व्यक्तीचे अपशब्द ऐकू येताच मुख्यमंत्री थेट काँग्रेस कार्यालयात धावून गेल्याचा प्रकार समोर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील सभा संपवून घरी जात असताना काँग्रेसचे उमेदवार नसीम आरिफ खान यांच्या प्रचार कार्यालयाबाहेर एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरले.

या व्यक्तीचे शब्द कानावर पडताच मुख्यमंत्री शिंदे संतापले आणि ते थेट गाडीतून उतरून काँग्रेसच्या (Congress) प्रचार कार्यालयातच शिरले. यावेळी त्यांनी त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. शिवाय कार्यालयात गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी तिथे बसलेल्यांना कार्यकर्त्यांना 'तुम्ही हे करायला इकडे बसला आहात का?' असा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने अपशब्द वापरणाऱ्याला व्यक्तीला ताब्यात घेतलं. मात्र, या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. स्थानिक शिवसैनिकांनी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला आणि मोठी घोषणाबाजी देखील केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे मुंबईतील साकीनाका येथील सभा संपवून जाताना मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. संतोष कटके नावाच्या व्यक्तीने काळा झेंडा घेऊन शिंदे यांचा ताफा अडवण्यचा प्रयत्न केला. ताफा अडवणारा व्यक्ती शिवेसना ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT