Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Group News : शरद पवार गटातील एक बडा नेता अजितदादांसोबत जाणार; लवकरच मंत्रिपदाची शपथ घेणार...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात हा नेता मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Big leader of the Sharad Pawar faction is going to join Ajit Dada's group)

राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) हा बडा नेता ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अत्यंत जवळचा आहे. तसेच, तो नेता मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होता. शरद पवार गटात आपण एकाकी पडलो आहे, अशी भावनाही या नेत्याची झालेली आहे. संबंधित नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांनाही याबाबतच्या निर्णयाची माहिती दिल्याचे समजते.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत आठ आमदारही मंत्री झाले आहेत. या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्यांचा समावेश आहे.

आता पवारांसोबत असणारा हा नेताही अजितदादांच्या गोटात सामील होणार असल्याची मााहिती आहे. शरद पवारांच्या गोटात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे असे मोजके नेते राहिले आहेत. ते मागील सरकारमध्ये मंत्री होते. मागील काही दिवसांत त्या नेत्याच्या नावाची चर्चाही होत आहे. विशेष म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्रीपदही राखून ठेवण्यात आलेले आहे.

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या गोटातील आमदारांना भरघोस निधीचे वाटप केले आहे. त्याचरोबर शरद पवार यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांनाही निधी दिलेला आहे. त्यानंतरही अनेक आमदार दादांसोबत गेले आहेत. आता पवारांच्या गोटातील एक बडा नेता अजितदादांच्या गटात सामील होणार असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

आगामी काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आज पुण्यात त्या नेत्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुण्यात आहेत, तसेच केंद्रीय गृहमंत्री आज रात्री आठच्या सुमारास पुण्यात येणार आहेत. या दौऱ्यात शरद पवार यांच्या गोटातील त्या नेत्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT