Uddhav Thackeray| Eknath Shinde| 
मुंबई

Andheri By Poll| मोठी बातमी : अंधेरी पोटनिवडणूक भाजप नाही तर शिवसेना शिंदे गटच लढवणार

Andheri By Poll| अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अनुराधा धावडे

Andheri By Poll | मुंबई: अंधेरी पोटनिवडणूकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अंधेरी विधानसभेची जागेवर भाजप नाही तर शिंदे गट निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणूकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. इतके शिंदे गट ही निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात होते. तसेच शिंदे गटाने कोणताही उमेदवारही दिला नव्हता. तर भाजपने या जागेवर मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. पण अचानक शिंदे गट या जागेवर निवडणूक लढवणार असल्याने आता या निवडणूकीतील चुरस आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून तयारीही सुरु झाली आहे. पण इथेही उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी भाजप-शिंदे गटाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. शिंदे गटाकडूनही अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली असताना आता ऋतुजा लटके शिंदे गटात यावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ऋतुजा लटके मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के/पूर्व कार्यालयात कर्मचारी होत्या. त्यांनी साधारण महिन्याभरापूर्वी राजीनामा दिला आहे. पण लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. लटके यांचा राजीनामा स्वीकारला जात नसल्यामुळे इथेही उद्धव ठाकरे यांची कोंडी केली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणूकीच्या निकालातून जनतेने एकनाथ शिंदे यांना स्वीकारलं की नाही हे दिसून येणार आहे. अनेकाचं मत यावरुन दिसून येणार आहे. त्यामुळे ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT