Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Supreme Court News: एका 'डोंगरानं' अडवला धनुष्यबाण! शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी लांबणीवर काय आहे कारण?

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Shiv Sena SC Hearing: सरकारने १०० मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या भागालाच डोंगर मानण्याचा जो अहवाल दिला होता, तो पर्यावरण विरोधी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकांवर ही सुनावणी होणार आहे, असे सरोदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Mangesh Mahale

Eknath Shinde Uddhav Thackeray News : राज्यात सध्या सत्तास्थापनेसाठी चढाओढ सुरू आहे. महापौर कोण होणार याासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये शर्यत लागलेली आहे. दोन्ही पक्ष आकडे जुळवत आहे, अशातच शिवसेनेबाबतचा महत्वाचा फैसला आज कोर्टात होणार आहे.

आज दोन महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी कोर्टात होती, एक म्हणजे मुळची शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याबाबत कोर्टात कामकाज होणार होते, पण या दोन्ही सुनावण्या पुढे ढकलण्याची शक्यता असल्याचे या प्रकरणाची बाजू मांडणारे पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. तांत्रिक आणि विशेष कामकाजामुळे ही सुनावणी पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकण्याचे चित्र आहे.

आज दुपारी १ वाजेपर्यंतच सरन्यायाधीश सूर्यकांत हे त्यांच्या नियमित न्यायालयाचे काम पाहणार आहेत. त्यानंतर ते विशेष न्यायालयाच्या काम पाहणार आहेत. दुपारी १ वाजल्यापासून सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांचे विशेष पीठ 'अरावली डोंगर रांगा' या बाबतची अत्यंत संवेदनशील प्रकरणावर सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबतची सुनावणी आज होण्याची शक्यता कमी असल्याचे सरोदे यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

सरकारने १०० मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या भागालाच डोंगर मानण्याचा जो अहवाल दिला होता, तो पर्यावरण विरोधी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकांवर ही सुनावणी होणार आहे, असे सरोदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

"आज दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजतापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील. अरावली डोंगर रांगा बाबत च्या केसची सुनावणी घेण्यात येईल त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही, असे सरोदे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान आता ही सुनावणी पुढील शुक्रवारी होणार आहे, असे कोर्टाने सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT