Highcourt, Manoj jarange  Sarkarnama
मुंबई

high Court Manoj Jarange : मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; मनोज जरांगेंना हजर राहण्याचे निर्देश

Maratha reservation News : सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सरकारला महत्त्वाचा आदेश दिला.

Sachin Waghmare

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सरकारला महत्त्वाचा आदेश दिला. याप्रसंगी राज्याचे महाधिवक्ता डॉ. रवींद्र सराफ न्यायालयात हजर होते.

राज्य सरकारने रस्ता ब्लॉक होणार नाही, याची येत्या काळात काळजी घ्यावी. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बिघडणार नाही, याची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले. त्यासोबतच याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस पाठवावी. मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात (Mumabi high Court) हजर होण्याबाबत नोटीस पाठवावी. आझाद मैदानात पाच हजारपेक्षा जास्त नागरिक येऊ शकत नाहीत, हेपण त्यांना कळवावे, असे आदेश कोर्टाने यावेळी दिले.

अंतरवाली सराटी येथून मराठा नेते मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणाच्या (Maratha Resevation) मागणीसाठी मुंबईच्या दिशेला पायी निघाले आहेत. त्यांचा पायी मोर्चा बुधवारी पुण्यात पोहोचला आहे. ते उद्यापर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. त्यांच्यासोबत हजारो मराठा कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

मराठा आंदोलनाच्यानिमित्ताने राज्यभरातून गाड्या, बैलगाड्यांसह अनेक आंदोलक नागरिक हे मुंबईच्या दिशेला येत आहेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी कोर्टात केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कारवाई करण्याची राज्य सरकारकडून हमी

यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रवींद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना महत्त्वाचे निर्देश दिले. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावर योग्य ती कारवाई करण्यास तयार आहे, अशी हमी महाधिवक्ता रवींद्र सराफ यांनी राज्य सरकारकडून हायकोर्टाला दिली.

R...

SCROLL FOR NEXT