Supreme Court Sarkarnama
मुंबई

Local Body Election : मोठी बातमी! अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात उद्या सुनावणी होणार?

Maharashtra local body Election : या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra News : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी उद्या दि.21 मार्चला होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा प्रशासकांच्या हाती आहे.

राज्यातील 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भातील सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोरोनानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे आता उद्या तरी (दि.21मार्च) याबबात सुनावणी होणार का? सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT