Maharashtra Cabinet Decision:
Maharashtra Cabinet Decision:  Sarkarnama
मुंबई

Cabinet Decision: शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य मंत्रिमंडळाचे 12 मोठे निर्णय

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 12 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

केंद्र सराकारने सुरू केलेल्या 'पीएम किसान सन्मान निधी योजने'च्या धर्तीवर आता राज्यात देखील 'शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरु करण्यात आली आहे. या 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

या बरोबरच आता फक्त एक रुपयात पीक विमा योजनेच्या घोषणेला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 'नमो शेतकरी महासन्मान योजने'चा राज्यातील जवळपास एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेण्यात आले?

- कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता. लाखो कामगारांचे हित जपले.

- केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार.

- डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविणार.

- सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. २२.१८ कोटी खर्चास मान्यता

- महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

- बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय

- अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार

- नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार.अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता

- राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

- कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता.२५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

- सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT