Nawab Malik  Sarkarnama
मुंबई

Nawab Malik आणखी सहा महिने तुरुंगाबाहेरच राहणार!

NCP Politics: फेब्रुवारी 2022 पासून मलिक तुरुंगात होते.

Mangesh Mahale

Mumbai News : मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसते नेते, माजी मंत्री नवाब मलिक आणखी सहा महिने तुरुंगाबाहेरच राहणार आहेत. मलिकांना सुप्रीम कोर्टाकडून हा दिलासा मिळाला आहे.

सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर असलेल्या मलिकांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. न्यायालयाने त्यांना आता सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.

नवाब मलिक यांना 11 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन दिला होता. त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात तीन महिन्यांचा वैद्यकीय जामीन कोर्टाकडून मंजूर केला होता. फेब्रुवारी 2022 पासून मलिक तुरुंगात होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मूत्रपिंडविकार आणि अन्य आजारांवर उपचार करता यावा, याकरिता त्यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने मलिकांना प्रकृतीच्या कारणास्तव 11 ऑगस्ट 2023 ला दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला.

गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँड्रिंगप्रकरणी मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर मलिकांना ११ ऑगस्टला जामीन मंजूर झाला. नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला असून ते तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. मलिक यांना जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. मालिकांना ५० हजारांच्या वैयक्तिक बॅान्डवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणातील साक्षीदार व अधिकारी यांच्याशी मलिकांनी संपर्क ठेवायचा नाही. मलिकांशी संपर्क होईल, तो नंबर ईडीच्या अधिकाऱ्यांना देण्यात यावा. मलिकांचा पासपोर्ट ईडीकडे जमा करण्यात यावा. याबरोबरच कुठल्याही माध्यमांशी संवाद साधायचा नाही, अशा अटी जामीन मंजूर करताना कोर्टाने घातलेल्या असून त्यांना या अटींचे पालन करावे लागणार आहे. ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली. या संपूर्ण प्रकरणात गाजलेली गोवावाला कंपाऊंड ही जमीनही या कारवाईत ईडीने जप्त केली आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT