Supreme Court Result on Shrikant shinde
Supreme Court Result on Shrikant shinde Sarkarnama
मुंबई

Supreme Court Result : ‘आमच्यासाठी मोठा विजय; समोरच्यांसाठी आय ओपनर’ : श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court ) हा निकाल (Result) म्हणजे आमच्यासाठी मोठा विजय आणि समोरच्यांसाठी आय ओपनर आहे, त्यामुळे त्यांनी यापुढे कोर्टात जाताना विचारपूर्वक गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिली. (Big win for us; Eye opener for others : MP Shrikant Shinde)

शिवसेना आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज दिवसभर दोन्ही बाजूंकडून अक्षरशः घामसान झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी कायद्याचा किस पाडत युक्तीवाद केला. मात्र. सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देता येणार नाही, असा निर्णय दिला. त्यानंतर श्रीकांत शिंदे हे माध्यमांशी बोलत होते.

खासदार शिंदे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने वेळ दिला होता. त्यातून न्यायालयाचाही मान राखण्यात आला हेाता. सर्वोच्च न्यायालयाने आता आपला अंतिम निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाची प्रक्रिया ही स्वतंत्र आहे, कारण ती संस्था स्वायत्त आहे. निवडणूक आयोगाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल ‘आमच्यासाठी मोठा विजय आणि समोरच्यांसाठी ‘आय ओपनर’ असा हा निकाल आहे.

या निकालानंतर शिवसेनेला सुनावताना श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, कुठल्या गोष्टीसाठी आपण कोर्टात गेले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींसाठी गेले नाही पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टी आपण कोर्टात जाऊ लागलो, तर याच बाबींच्या केसेस कोर्टात उभ्या राहतील. महत्वाचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतील. यापुढे कोर्टात जाताना त्यांनी विचारपूर्वक गेले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT