Political analysts predict major shifts in Maharashtra after NDA’s sweeping victory in Bihar. Sarkarnama
मुंबई

Bihar Election result : बिहारने मुंबईचंही गणित सेट केलं? भाजपला BMC चा कॉन्फिडन्स; ठाकरेंना धक्का देण्यासाठी कार्यकर्ते चार्ज

Bihar Election result : बिहारमध्ये एनडीएच्या दणदणीत विजयानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याचे विश्लेषकांचे मत. महायुतीची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची तर महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त.

Hrishikesh Nalagune

BJP In BMC : बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपने आता आपला फोकस मुंबई महानगरपालिका जिंकण्यावर ठेवला आहे. मुंबई पादाक्रांत करण्यासाठी भाजपचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा दुणावला आहे. कार्यकर्त्यांना या विजयाने बळ मिळाल्याची भावना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केली.

बिहार निकालानंतर माध्यमांशी बोलताना अमित साटम म्हणाले, व्होट चोरीचे फेक नरेटिव्ह बिहारच्या जनतेने उधळून लावले आहे. बिहारची निवडणूक म्हणजे ट्रेलर असून, खरा पिक्चर मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल. पालिका निवडणुकीत बिहारी मतदार भाजपच्या पाठीशी राहील, असाही विश्वास त्यांनी केला आहे.

मुंबई जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून भाजप कामाला लागली आहे. त्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीची सूत्रे भाजपने अमित साटम यांच्याकडे दिली आहेत. आता बिहारच्या निकालाने भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

शिवसेना प्रवक्ते (उद्धव ठाकरे पक्ष) हर्षल प्रधान यांनी सांगितले की, बिहारचा निकाल अपेक्षित असाच आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये निकाल लागला आहे. लोकशाहीचा हा घात आहे. मुंबई महापालिकेत हेच होणार आहे. जोपर्यंत ईव्हीएम आहे आणि निवडणूक आयोग सरकारच्या प्रभावाखाली आहे तोपर्यंत निवडणुकीला अर्थ नाही.

बिहारमधील निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडली नाही, हे स्पष्ट झाले. आज लागलेला निकाल हा जनतेचा कौल आहे की निवडणूक आयोगाचा? असा सवाल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे. दरम्यान, काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT