Jitendra Awhad, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad Birthday : जितेंद्र आव्हाडांना शुभेच्छा, तर अजितदादांना टोले; ठाण्यात बॅनरबाजी

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे पुतणे अजित पवार बंड करून ३५ आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. मात्र काही आमदार पवारांशी आपली निष्ठा कायम राखून आहेत. यात माजी मंत्री आमदार जिंतेद्र आव्हाडांचा आघाडीवर असल्याचे बोलले जाते. या आव्हाडांचा आज शनिवारी वाढदिवस आहे. ठाण्यात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी 'बॅनर' लागले आहेत. शुभेच्छा देताना ठाणेकरांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोलेही लगावले आहेत. यामुळे या फलकांची राज्यभर चर्चा सुरू आहे. (Latest Political News)

ठाणे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाणे शहरात शुभेच्छांचे 'बॅनर' लावत एकप्रकारे पक्षाची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या 'बॅनर'द्वारे अजित पवार यांना टोला लगावण्यात आल्याचेही पाहायला मिळत आहे. 'ठाण्याचा पठ्ठ्या साहेबांशी निष्ठावान आहे, होता आणि मरेस्तोवर राहणार' अशा आशयाची बॅनरबाजी ठाणे स्टेशन परिसरात करण्यात आली आहे.

बंड केल्यानंतर अजित पवारांनी आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात आव्हाडांवर टीका केली होती. "त्या ठाण्याच्या पठ्ठ्याने तर कमालच केली. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक चांगले शिलेदार सोडून गेले. तरी साहेबांनी त्यांना जवळ ठेवले, ते का अजूनही मला समजलेले नाही", असे अजितदादा आव्हाडांबाबत बोलले होते. हाच धागा पकडून ठाणेकरांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

Banners in Thane

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर ठाण्यात शरद पवार आणि त्यानंतर अजितदादा गटातील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकाने पूर्ण शहरभर 'बॅनर' लावत त्या जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावंत लोकनायक असा उल्लेख केला आहे. बॅनरबाजी करताना त्यांनी विरोधकांसह अजितदादा गटातील कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT