kalyan dombivli municipal corporation
kalyan dombivli municipal corporation  sarkarnama
मुंबई

भाजपला मोठा धक्का ; पाच नगरसेवक शिवसेनेत..

सरकारनामा ब्युरो

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचा (kalyan dombivli municipal corporation election ) निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्याआधीच शिवसेना सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याची माहिती आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होणार आहे.

शिवसेना (shivsena) भाजपला (bjp) धक्का देणार असल्याचे समजते. भाजपचे ४ ते ५ माजी नगरसेवक सोमवारी संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.

डिसेंबर महिन्याच्या आधी भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (yashwant jadhav)यांनी काही दिवसापूर्वी केला होता. पण भाजपने आमचे कुठलेही नगरसेवक सेनेत प्रवेश करणार नाही, असा दावा केला आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील, सायली विचारे, माजी नगरसेवक महेश पाटील यांच्यासह अजून एक ते दोन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. हे नगरसेवक भाजपच्या नेतृत्त्वाला कंटाळले आहेत.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपचे हे 5 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होणार आहे. भाजपचे ५ नगरसेवक सेनेत प्रवेश करणार आहे.

आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो ; मलिकांच्या टि्वटला वानखेडेंचे प्रत्युत्तर

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक सातत्याने करीत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील ते सादर करीत असतात. रविवारी मध्यरात्री मलिकांनी दुबईहून पुन्हा एकदा समीर वानखेडे यांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत.मलिक यांनी वानखेडे यांच्याबाबत फोटो शेअर केल्यानं खळबळ उडवून दिली आहे. या फोटोवरुन मलिकांची वानखेडेंना जाब विचारला आहे. या फोटोबाबत वानखेडे काय उत्तर देणार याकडे सगळ्याचे लक्ष लागते होते. या फोटोबाबत समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी काही फोटो शेअर करीत मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT