devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawar sarkarnama
मुंबई

Assembly Election 2024 : राज्यात 'मविआ' महायुतीला धूळ चारणार, महाराष्ट्राचा कौल पवार, ठाकरेंच्या बाजूने

Akshay Sabale

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं 'मैदान' महाविकास आघाडीनं मारलं. पण, महाराष्ट्राचं 'खरं मैदान' हे विधानसभेचं आहे. अवघ्या काही महिन्यांत, म्हणजे ऑक्टोबरमध्ये हे 'मैदान' भरणार असून, महायुती की महाविकास आघाडी हे मैदान मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याचं कारण, 5 वर्षांत महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी या मैदानावर घडल्या आहे. त्या अभूतपूर्व होत्या. त्यामुळे राजकारण 'बुद्धीबळा'च्या पटापेक्षा 'कुस्ती'चं मैदान झालं. पातळी सोडून नेते एकमेकांना आव्हान देऊ लागले. शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष, आमदार फुटले, चिन्ह आणि पक्ष विभागली गेली. त्यातच लोकसभेच्या निवडणुका लागल्या.

दोन पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ( Mahavikas Aghadi ) सरशी ठरली. महाविकास आघाडीला '31' जागा मिळाल्या. तर, '45 पार'चा नारा देणाऱ्या महायुतीला '17' जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लोकसभेसारखाच 'कित्ता' महाविकास आघाडी लोकसभेला 'गिरविणार' की महायुती सरस ठरणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे.

यातच 'सकाळ माध्यम समूहा'नं राज्यातील मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. त्यानुसार 'महाविकास आघाडी' की 'महायुती' ( mahayuti ) या प्रश्नावर उत्तर देताना अधिक मतदारांनी 'महाविकास आघाडीला' पसंती दिली आहे. त्यासह सर्व पक्ष स्वतंत्र लढले, तर पक्षनिहाय मिळालेल्या प्राधान्यात भाजप क्रमांक एकवर आहे. पण, बहुमतापासून दूर असेल, तर दिसतं.

सर्वेक्षणानुसार 288 पैकी महाविकास आघाडीला 152 जागा मिळताना दिसत आहे. तर, महायुतीला 136 जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय विभागणी केली, तर भाजप आमदारांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये 105 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष बनला होता. पण, 2024 ला त्यात घट होत 95 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्रमाकांवर काँग्रेस पक्ष आहे. तर, फुटलेल्या दोन्ही पक्षांमध्ये ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाला मतदारांनी पसंती देत 'ओरिजनल' कोण हे एकप्रकारे दाखवून दिलं आहे.

शिवसेना शिंदे गट हा थेट पाचव्या क्रमाकांवर फेकल्याचं सर्वेक्षणात दिसत आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागाही घटल्याचं समोर येत आहे.

कुणाला किती जागा मिळणार?

भाजप - 95

काँग्रेस - 67

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) - 41

शिवसेना ( ठाकरे गट ) - 31

शिवसेना ( शिंदे गट ) - 27

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) - 18

अपक्ष - 9

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT