Amit Shah, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : निकालानंतर केवळ 48 तासांचा वेळ; राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा शहांचा डाव, राऊतांचा खळबळजनक आरोप

Sanjay Raut On Amit Shah and Maharashtra Assembly Elections : "राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकाचा निकाल जाहीर केला जाणार. मात्र, निकालानंतर पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागणार आहे."

Jagdish Patil

Mumbai News, 20 Oct : "राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी इतका कमी वेळ दिला जात नाही. 48 तासांचा वेळ नवीन सरकार बनविण्यासाठी मिळणार आहे. पण हा वेळ पुरेसा नाही.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकाचा निकाल जाहीर केला जाणार. मात्र, निकालानंतर पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागणार आहे. यावरूनच संजय राऊतांनी यांनी अमित शाहा (Amit Shaha) यांच्यावर खळबजनक आरोप केला आहे.

राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "20 तारखेला मतदान आहे, तर 23 तारखेला निकाल आणि 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे. खरं म्हणजे सरकार स्थापन करायला इतका कमी वेळ दिला जात नाही. महाविकास आघाडी निवडणूक जिंकणार आहे. 23 ला जर मतमोजणी आहे तर पूर्ण निकाल लागेपर्यंत 24 तारीख उजाडेल. 24 ते 26 नोव्हेंबर असा 48 तासांचा वेळ नवीन सरकार बनविण्यासाठी मिळणार आहे. मात्र, हा वेळ पुरेसा नाही."

यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप अमित शाहांवर केला.ते म्हणाले, "निकालानंतर 48 तासांत सरकार स्थापन करून शपथविधी करावा लागणार आहे. या काळात दोन्ही आघाड्यांना आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत दाखवावं लागणार आहे.

या दिलेल्या वेळेत सरकार बनलं नाही तर विधानसभेचा कालावधी संपून नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अमित शाहांचं कारस्थान आहे.

महाराष्ट्रात घाईघाईने निवडणुका घेऊन भाजप आपले मनसुबे पूर्ण करीत असून अमित शाहा आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आपण महाराष्ट्र गमावू याविषयी खात्री पटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जिंकली तरी त्यांना सरकार स्थापनेस पुरेसा वेळ मिळू नये. यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे.

सरकार स्थापन केलं नाही म्हणून पुढील सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन लावून राज्य करायचं असा शाहांचा डाव आहे," असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. त्यामुळे त्यांच्या या आरोपाला आता भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातंय हे पाहणं महतव्याचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT