naresh mhatre | ganesh naik | sandeep naik sarkarnama
मुंबई

Navi Mumbai : बेलापुरातून मंदा म्हात्रेच, नाईक पिता-पुत्र कोणती भूमिका घेणार?

Ganesh Naik Vs Manda Mhatre : गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात वितुष्ट जगजाहीर आहे. त्यात भर पडली गणेश नाईक यांनी मुलासाठी बेलापूर मतदारसंघावर दावा केल्यानंतर. मात्र, आता भाजपनं पुन्हा मंदा म्हात्रेंना तिकीट दिल्यानं नाईक पिता-पुत्राच्या भूमिकाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Akshay Sabale

Assembly Election 2024 : भाजपनं रविवारी 99 जणांनी पहिली यादी जाहीर केली. यादीनंतर नवी मुंबईतील तिढा सुटण्याऐवजी वाढलाच आहे. बेलापूर आणि ऐरोली, असं दोन मतदारसंघ मिळण्यासाठी गणेश नाईक यांनी ‘फिल्डिंग’ लावली होती. मात्र, बेलापूरमधून पुन्हा मंदा म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलं आहे.

बेलापूर येथून गणेश नाईक यांचे सुपुत्र, भाजपचे जिल्ह्याध्यक्ष संदीप नाईक इच्छुक होते. परंतु, तिकीट नाकारल्यानं नाईक पिता-पुत्र कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांचे सुपुत्र संजीव नाईक हे लढण्यासाठी इच्छुक होते. पण, अखेरच्या क्षणी संजीव नाईक यांचा पत्ता कट करून शिंदेंच्या शिवसेनेतील नेते, नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा, नाराज झालेल्या गणेश नाईक यांची समजूत काढत विधानसभेला दोन जागा देण्याचं भाजपच्या नेतृत्त्वानं मान्य केलं होतं, असं बोललं जातं.

गणेश नाईक यांनी ऐरोलीसह मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर मतदारसंघावर दावा केला होता. त्यादृष्टीनं संदीप नाईक यांच्याकडून बेलापूर मतदारसंघात तयारी देखील करण्यात येत होती. त्यामुळे गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत होते. मात्र, भाजपच्या पहिल्या यादीत संदीप नाईक यांचं नाव नसल्यानं नाईक गटातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

‘तुतारी’ हाती घेणार?

संदीप नाईक बेलापूरमधून निवडणूक लढवण्यार ठाम आहेत. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे गणेश नाईक आणि संदीप नाईक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक होती. या बैठकीत संदीप नाईक यांच्याबद्दल निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं काही घडलं नाही.

शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष...

नवी मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी नाईक यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. त्यामुळे नाईक यांच्याबाबत शरद पवार काय निर्णय घेतात, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.  

नाईक दोन दिवसांत निर्णय घेणार?

गणेश नाईक नवी मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करायचं की अपक्ष लढायचं, याबद्दल दोन दिवसांत ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT