Uma Khapare, Pankaja Munde Latest Marathi News
Uma Khapare, Pankaja Munde Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

पंकजा मुंडेंना डावलून उमा खापरेंना संधी: दरेकर, लाड, भारतीय, शिंदेंनाही विधान परिषेदची उमेदवारी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून घमासान सुरू असतानाच भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड व माजी मंत्री राम शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. तर श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनाही विधान परिषदेची लॉटरी लागली आहे. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पत्ता पुन्हा कट झाला आहे. (BJP Latest Marathi News)

भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पंकजा मुंडे यांनी आपण विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचं नावही चर्चेत होतं. पण दोघींनाही संधी देण्यात आलेली नाही. (BJP Announced candidates name for Legislative Council Election)

पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनाही संधी दिली आहे. दरेकर, लाड व शिंदे यांच्या नावांवर आधीच शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात होते. तिघेही नेते फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात.

परिषदेसाठी ९ जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने आज यादी जाहीर करण्यात आली आहे. १० जूनच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ ऐवजी ८ जून रोजीच नावे निश्चित होवून अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते, (शिवसेना) प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (सर्व भाजप) संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील.

विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता असणार आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 53, शिवसेना (Shivsena) 56 आणि कॉंग्रेसचे (Congress) 44 आमदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT