Murji Patel  
मुंबई

Andheri By Election : भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची माघार

Andheri By Election| अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर आहे.

अनुराधा धावडे

Andheri By Election मुंबई : भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच माध्यमांना माहिती दिली. आता ऋतुजा लटकेंची ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे सध्या ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर मुरजी पटेल यांनी ऋतुजा लटके यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आपल्यावर कोणताही दबाव नसुन पक्षाच्या आदेश पाळणार असल्याची प्रतिक्रीयाही दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषदेतून भाजपकडे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. तर शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्राद्वारे भावनिक आवाहन केले होते.

त्यानंतर आज सकाळपासून भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला होता. याबाबत केंद्रीय सचिव आणि महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी आणि देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार आणि या निवडणुकीशी संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर अखेर भाजप वरिष्ठांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली.

दरम्यान, या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. ऋतुजा लटके यांच्या राजीनामा महापालिकेकडून मंजूर कण्यात अडचणी येत होत्या. शेवटी ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांचा राजीमाना मंजूर करण्यात आला. त्यानंतरही लटके यांच्यावर आरोप करण्यात आले. पण काल राज ठाकरे, शदर पवार आणि प्रताप सरनाईक यांच्या आवाहनानंतर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT