INDIA Alliance Meeting  Sarkarnama
मुंबई

Chandrashekhar Bawankule News : बावनकुळे म्हणतात, "इंडिया आघाडी'ची बैठक म्हणजे फुसका बार"

INDIA Alliance Meeting : "राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा कोणीच मानायला तयार नाहीत,"

Mangesh Mahale

Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी 'इंडिया आघाडी'ची बैठक होत असताना भाजप नेत्यांनी बैठकीवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीची खिल्ली उडवली आहे. "इंडिया आघाडी'ची बैठक म्हणजे फुसका बार आहे," असे बावनकुळे म्हणाले.

गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा (2019)आगामी निवडणुकीत (2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा अधिक खासदार देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. हे खासदार मोदींच्या पाठीमागे उभे राहतील यासाठी तयारी सुरू केलेली आहे," असे बावनकुळे म्हणाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेला नाही. त्यावरुन त्यांनी काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले,"राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा कोणीच मानायला तयार नाहीत,"

"इंडिया आघाडीच्या नेत्यांची स्वार्थासाठी ही तडफड सुरु आहे. फक्त कुटुंबियांसाठी सगळी टोळी एकत्र आली आहे. त्यांना भष्ट्राचारावर बोलण्याचा अधिकारी नाही. अशा आघाड्या अनेकवेळा झाल्या. फायद्यांसाठी अशा आघाड्या होत असतात," अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी, संधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा… ही कविता टि्वट करून निशाणा साधला आहे. इंडिया आघाडीची पहिली बैठक 23 जून 2023 रोजी बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोध पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. सध्या सुरु असलेल्या मुंबईतील बैठकीला विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण केले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT