Gujarat Assembly Election 2022 sarkarnama
मुंबई

Gujarat Election : प्रचारासाठी कोटींची उड्डाणे, विमाने,हेलिकॉप्टरच्या बुंकिगसाठी भाजप, काँग्रेस, आपची धावाधाव

Gujarat Assembly Election 2022 : आगाऊ बुकिंगचा आकड्याने शताब्दी गाठली आहे.

सरकारनामा ब्युरो

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे.विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रचाराच्या तयारीला वेग आला आहे. उमेदवाराच्या नावाची यादी, स्टार प्रचारकांच्या नावे जाहीर करण्यात आली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मोठे नेते प्रचारात उतरणार आहेत. यंदा प्रथमच आपने गुजरात निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कॉंग्रेस आणि भाजप रणधुमाळीत आप आपले नशीब आजमावत आहेत. प्रचारासाठी सर्वच पक्षानी जोरदार तयारी केली आहे. बड्या नेत्यांच्या सभांसाठी आवश्यक असणारे चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरचे बुंकिग केले जात आहे.

चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरचे बंपर बुकिंगसाठी राजकीय पक्ष धावाधाव करीत आहे. सर्वाधिक बुकिंग भाजपने केले आहे.चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरचे हे बुकिंग कोटींची उड्डाण घेत आहेत. काँग्रेस, आप, भाजपने केलेल्या आगाऊ बुकिंगचा आकड्याने शताब्दी गाठली आहे. अॅडव्हान्स बुकिंगचा आकडा १०० कोटींपर्यंत पोहोचला आहे.

जेट विमानांचे अॅडव्हान्स बुकिंग २ ते ४ लाख, टर्बो क्रॉप इंजिन असणाऱ्या विमानाचे १.४० लाख आणि ट्विन इंजिन हेलिकॉप्टरचे ३ ते ३.७५ लाख रुपये प्रतितासाने भाडे तत्वावर मिळते.

काँग्रेसनेही १-१ चार्टर्ड प्लेन आणि हेलिकॉप्टर बुक केले आहे. आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीतून चार्टर्ड घेऊन येतात.अहमदाबादेत अॅडव्हान्स बुकिंग होत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपने २ चार्टर्ड आणि २ हेलिकॉप्टर बुक केले होते. या वेळी ३ चार्टर्ड आणि ४ हेलिकॉप्टर बुक केले आहेत. दिल्लीतून १-१ चार्टर्ड व हेलिकॉप्टर अहमदाबादेत दाखल झाले आहे. अहमदाबाद-मुंबई आणि दिल्लीपर्यंतच्या विमानसेवेसाठी प्रदाता कंपनीच्या हेलिकॉप्टर-चार्टर्डचे अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले आहे.

गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान (Voting) होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT