Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या 'या' विधानामुळे चर्चांना उधाण ; 'योग्यवेळी निर्णय घेणार..'

Devendra Fadnavis On Uniform Civil Code : "राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करु," असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सरकारनामा ब्युरो

Devendra Fadnavis On Uniform Civil Code : लग्न आणि घटस्फोट याबाबत विविध कायद्यांमधल्या वेगवेगळया तरतुदींमुळे वाद निर्माण होत आहे. ते संपुष्टात आणण्याची गरज असल्याचं म्हणत काही महिन्यांपूर्वी दिल्ली हायकोर्टाने समान नागरी कायदा लागू करण्याची गरज व्यक्त केली होती.त्यामुळे देशात हा कायदा लागू करण्यासाठी मोदी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. (Uniform Civil Code news update)

समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंड लागू करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचं मत मांडले आहे. ते गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. "राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करु," असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

यामुळे महाराष्ट्रात समान नागरी कायद्या कधी लागू होणार याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. “संविधानाने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळेच कायदा लागू करतील असं मला वाटतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंड लागू करत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करतील.शिवाय त्यांना करावाच लागेल”, असे फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्रही योग्यवेळी हा कायदा लागू करण्याबाबत विचार करेल. संविधानाने याबाबत आपल्यावर जबाबदारी टाकली की राज्यात समान नागरी कायदा आणणार”, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT