Kalyan News, 18 Sep : महायुतीत मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी रात्री शहाड परिसरात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. बॅनर लावण्यावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यामुळे 3 जण गंभीर जखमी झालेत.
या हाणामारीमुळे सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे. तर महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसनेनेमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यावरून दोन गटात वाद झाला. भाजपच्या फ्रेमवर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावरूनच भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट यांच्यात वाद झाला.
या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यामध्ये मोहन कोणकर, मुकेश कोट यांच्यासह एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. या घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मारहाणी प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केलेत.
दरम्यान, महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप एकत्र असले तरी स्थानिक राजकारणातील त्यांच्यात असणारे मतभेद दिसून येतात. दोन वर्षांपूर्वी माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यातील वादामुळे थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला होता. अशातच आता शहाड येथे बॅनर लावण्यावरून झालेल्या वाद आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो.
भाजपच्या मोहन कोनकर यांनी गणेश कोट शिंदेंच्या शिवसेनेचा माजी नगरसेवक असल्यामुळे दादागिरी करतो, लोकांना त्रास देतो, असा आरोप केला आहे. शिवाय मी लावलेल्या बॅनरवर ते बॅनर लावत होते त्यांनी तो बाजूला लावायला पाहिजे होता. बॅनरवाल्याने गणेश यांना फोन केल्यानंतर तो तिथे आले आणि आमच्यावर हात उचलायला लागला, असा आरोप महेश कोनकर यांनी केला.
तर आमचा बॅनर लावण्यासाठी एक मुलगा गेला होता. मात्र, मोहन कोनकर या भाजप कार्यकर्त्याने आमचा बॅनर लावू दिला नाही. मी घटनास्थळी गेल्यावर त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला आणि त्यांनी मारायला सुरुवात केली. त्यामुळे हे सर्व बॅनरवरून झालं आहे, अशी तक्रार शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कोट यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.