Praveen Derkar : मुंबई : विधानपरिषदेतील भाजपच्या (BJP) गटनेते पदी प्रवीण दरेकर (Praveen Derkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दरेकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. विधानपरिषदेच्या सभागृह नेते पदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात दरेकर यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदार पार पाडली होती. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये दरेकर यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. दरेकर यांची आता भाजपचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते असताना दरेकर यांनी महाविकस आघाडी सरकारवर टीकेती झोत उठवली होती. सरकारवर टीका करुन त्यांनी महाविकास आघाडीला अडचणीत आणले होते. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता त्यांनी गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवून ही कामगिरी सोपविल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखून सर्व जबाबदारी मी चोखपणे बजावणार असा विश्वास यावेळी दरेकर यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.