Maharashtra Political Crisis Live: 2009 मध्ये काँग्रेसच्या ८१ जागा आल्या,काँग्रेसची सत्ता आली. पण महाराष्ट्रात आपले चार, सहा, सात, शिवाय खासदार आले नाही. मी ही खंत बोलून दाखवली, मला वाटत होतं आमचेही खासदार निवडून यावेत, आमचाही पक्ष वाढवा. आमदार वाढले पाहिजे, नवीन कार्यकर्ते वाढले पाहिजे. २००४ ची संख्या २००९ ला ६२ झाली २०१४ ला ४१ झाली, २०१९ ला ५४ झाली, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार स्थापन झालं.
राष्ट्रवादीची सत्ता नसतानाही १६ जागा राष्ट्रवादी, १६ शिवसेनेने आणि १६ भाजपने जागा लढवाव्यात, आपण ४८ जागा निवडून आणू. असा भाजपने प्रस्ताव मांडला. पण भाजपने नंतर माघार घेतली. आमदारांवर आरोप होते. नितीन गडकरी यांचीदेखील युतीची इच्छा होती. त्यानंतर केंद्रात भाजपची आणि राज्यात आपली सत्ता आली.
२०१९ ला आपला पराभव झाला. पण नेहमी ७१,६२ ५४ यापुढे आपण गेलो नाही. आता राज्यात आपली सत्ता आली आहे. प्रचंड बहुमत आहे. आता नऊ जणांनी शपथ घेतली आहे. पुढेही संधी मिळेल. वेगवेगळी खाती, पदे मिळतील. सरकार पडल्यानंतर अनेक आमदारांची काम थांबली. ती काम सुरु होतील, वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय घेतलेला नाही. (Ajit Pawar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.