Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

सत्तांतरानंतर भाजप, शिंदे गट अन् शिवसेना आमने-सामने; मतदार करणार फैसला

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरी, सत्तांतर आणि त्यानंतरच्या राजकीय संघर्षात अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनिमित्त भाजप (BJP) आणि शिवसेना समोरा-समोर येणार आहेत. भाजपने मुरजी पटेल यांना तिकिट दिले आहे. तर शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी असले. दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या पटेल यांना शिंदे गटाची साथ मिळणार आहे.

शिवसेनेच्या तिकिटावर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रमेश लटके विजयी झाले होते. लटके यांचे मे महिन्यात निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेनेतील बंडानंतर या मतदारसंघातून शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाणार अशी चर्चा होती. मात्र, भाजप-शिंदे गटातील चर्चेनंतर या मतदारसंघातून भाजपने पटेल यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पटेल हे अपक्ष लढले होते. तेव्हा त्यांना लटके यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. ही जागा जिंकून शिवसेनेला शह देण्याच्या हेतुने भाजपचे पटेल यांच्या नावाला पसंती दिली आहे. पटेल यांचा वैयक्तिक करिष्मा, शिंदे गटाची साथ आणि भाजप असे गणीत जूळवत भाजपने शिवसेनेला शह देण्याची तयारी केली आहे.

बंडानंतर शिवसेनेच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून ऋतुजा यांना निवडणूक रिंगणात उतरविले जाणार आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व शिंदे गटातील वाद वाढत आहे. अशातच पोटनिवडणूक होणार असल्याने पुढच्या काही दिवसांत मुंबईतील राजकारण तापणार असल्याचे स्पष्ट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT