Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Ekanth Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Mahayuti News : महायुतीत भाजपच मोठा भाऊ; शिंदे गटातील नेत्याचा स्वपक्षीयांना घरचा आहेर

Jagdish Patil

Mumbai News, 17 June : लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. लोकसभेच्या निकालावर विधानसभेची काही सुत्र ठरलेली असतात.

यंदाची लोकसभा महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी एकत्र लढवली. त्यामुळे जागावाटपात समतोल राखताना वरिष्ठांची चांगलीच दमछाक झाली. लोकसभेला आपल्या पक्षाच्या वाट्याला जास्त जागा याव्या यासाठी नेत्यांनी चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नाराजीनाट्य रंगल्याचंही पाहायला मिळालं.

अशातच आता विधानसभेला युतीतील कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जाणार यावरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण? यावरून वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा दाखला देत युतीत आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा केला होता.

मात्र आता त्यांचा हा दावा त्यांच्याच पक्षातील नेत्याने खोडून काढला आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी महायुतीत शिवसेना नव्हे तर भाजपच मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य करुन पक्षनेत्यांना घरचा आहेर दिला आहे. शिवाय एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस आहेत असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील युतीत मोठा भाऊ कोण यावर बोलताना निरुपम म्हणाले, भाजप (BJP) महायुतीत मोठा भाऊ आहे. भाजप मोठा पक्ष आहे यात शंका नाही. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे हे ठिक आहे. परंतु, भाजप हा राज्यात आणि देशात मोठा पक्ष आहे.

भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत हे वास्तव आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो आणि पुढेही लढू,फडणवीस यांचं विधानदेखील असंच असल्याचंही निरुपम म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT