Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Mahayuti Cabinet Expansion : शिंदेंकडून खात्यांची 'लिस्ट' वाढली, बसलेत अडून? भाजपकडून मनधरणी, तरच मंत्रिमंडळाचा शपथविधी

BJP ShivSena partey chief Eknath Shinde Mahayuti government : महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल होणार आहे, तत्त्पूर्वी एकनाथ शिंदे यांची मनधरणीसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता आहे. परंतु शिवसेना पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराजी काही दूर झालेली नाही. एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये पाहिजे असलेल्या खात्यांची 'लिस्ट' वाढतच चालली आहे.

महायुतीतील भाजपकडून यावर सहमती होत नसल्याने, एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांच्या या नाराजीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेत चर्चा केली.

शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात गृह खात्याबरोबरच नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि परिवहन आदी महत्त्वाच्या खात्यांसाठी आडून बसले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. पहिल्या टप्प्यात 25 ते 28 मंत्र्यांचा समावेश असलेले मंत्रिमंडळ असणार आहे. यात महत्त्वाच्या खात्यांवर एकनाथ शिंदे आडून बसलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना, मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतली.

महायुतीमध्ये (Mahayuti) खाते वाटपावर आणि मंत्रीपदांच्या वाटपावर पेच असून भाजपला 20, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10, असे मंत्रीपदांचे सूत्र भाजपने ठवरले आहे. प्रत्येकी आठ ते नऊ मंत्र्यांचा शपथविधी करून उर्वरित खाती काही काळ रिक्त ठेवावीत, असे महायुतीच्या नेत्यांकडून विचार मांडला जात आहे.

मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास तयारी ठेवावी, अशा सूचना प्रशासनाला आणि राजभवनावर देण्यात आल्या आहेत. मात्र किती मंत्री शपथविधी घेणार, कोणती खाती कोणाला मिळणार, याचा तपशील महायुतीकडून जाहीर करण्यात आलेला नाही.

यातच महायुतीत मंत्री संख्या, खाते वाटपाचा पेच मिटलेला नाही. एकनाथ शिंदे अजूनही नाराज आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्लीहून आल्यावर पुन्हा शिंदे यांना भेटले. यापूर्वी गिरीश महाजन, बावनकुळे यांनी देखील शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. महायुतीत खाते वाटपात कोणताही पेच नसल्याचे सांगितले जात असले, तरी एकनाथ शिंदे यांच्याशी 132 जागा असलेल्या भाजपला खाते वाटपासाठी वेळोवेळी चर्चा करावी लागत आहे. खाते वाटपात एकनाथ शिंदे यांची सहमती मिळाल्यावरच शनिवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT