Keshav Upadhye Slams NCP Supriya Sule : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पुणे जिल्ह्यातील “भीमाशंकर ज्योतिर्लिंग’(jyotirling) त्यांच्या राज्यात (आसाम)असल्याचा दावा केला आहे.यावरुन राजकारण तापलं आहे.यावर विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
काल (मंगळवारी) राष्ट्रवादीच्या नेत्या, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी याबाबत टि्वट केले आहे. भाजपकडून महाराष्ट्रातले उद्योग पळवण्यात आले. आता सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी टि्वट करुन केला होता, त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुळेंवर निशाणा साधत त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे.
भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे साममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केला आहे.आसाम पर्यटन विभागानं याबाबत जाहिरात देखील केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याला विरोध करीत भाजपला सुनावले आहे.
“ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले ? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत ? ” असा सवाल विचारण्यात आलाय.फक्त एव्हढंच बोलून ते थांबले नाहीत. “या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? महाविकासआघाडी सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले.” अशा शब्दात उपाध्येंनी उत्तर दिले आहे.
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी.या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी," अशी मागणीही सुळे यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.