Hasan Mushrif, Kirit Somaya
Hasan Mushrif, Kirit Somaya sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya : हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा ? ; सोमय्यांकडून Video व्हायरल..

सरकारनामा ब्युरो

Hasan Mushrif News : गेल्या काही महिन्यापासून भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. मागच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीने धाड टाकल्यानंतर किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते.

आज (शनिवारी) किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांनी आणखी एक घोटाळा केल्याचे त्यांनी सांगितलं आहे. सोमय्यांनी एक टि्वट करीत हे आरोप केले आहेत.

मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरव्यवहार केला आहे. मुश्रीफ यांनी त्यांच्या मालकीच्या ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनी या बॅकेच्या माध्यमातून १५६ कोटी रुपयांचे कर्ज दिले, थकीत कर्जात एनपीए करुन हा गैरव्यवहार अॅडजस्ट केला आहे. मुश्रीफ यांनी बँक प्रशासनाच्या संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्यांनी यापूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. "किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसापूर्वी दिली आहे.सोमय्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितलं.

मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "सोमय्यांकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत त्याचा मी निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप आरोप निराधार आहेत. शेअर, तारणावर कर्ज घेतलं, नातेवाईकांना कर्ज दिलं हे आरोप खोटे आहे," असे मुश्रीफ म्हणाले. "माझ्या बदनामीसाठी षडयंत्र आखलं जात आहे. याचा बोलवता धनी लवकरच उघड करू," अशा इशाराही मुश्रीफांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT