BJP Leader Crime News  Sarkarnama
मुंबई

BJP Crime News: भाजप नेत्याचा मध्यरात्री नग्नावस्थेत कॉल,म्हणाला,'एका तासासाठी घरी...?'; महिलेच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचा दणका

Mumbai Crime : एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बाब समोर येत आहे.मुंबईतील भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्यासोबत अश्लील वर्तणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बाब समोर येत आहे.मुंबईतील भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्यासोबत अश्लील वर्तणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी युसूफ रंगवाला याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंगवाला याचं भाजप कनेक्शन समोर येत आहे. तो कुलाबा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 224 चा भाजपचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,पीडित महिलेला भाजप पदाधिकारी व आरोपी युसूफ रंगवाला याने मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास फोन केला. यावेळी आरोपीकडून फोनवरुनच महिलेला मी एका तासासाठी तुमच्या घरी येऊ का?" अशी विचारणा करण्यात आली.महिलेनं त्याची या मागणीला तीव्र विरोध करत त्यास स्पष्ट नकार दिला.

यानंतरही आरोपी युसूफ रंगवाला यानं महिलेचा पिच्छा सोडला नाही. तरी त्यानं पीडित महिलेला वारंवार फोन करुन तिच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न कायम ठेवत मानसिक त्रास देणं सुरूच ठेवलं, अशी माहिती पोलिसांत दाखल करण्यात तक्रारीत म्हटलं आहे.

महिलेकडून स्पष्ट नकार मिळाल्यानंतरही आरोपी थांबला नाही. यानंतर आरोपी युसूफ रंगवाला यानं महिलेला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. धक्कादायक बाब म्हणजे व्हि़डीओ कॉल केला त्यावेळी आरोपी नग्नावस्थेत होता. तसेच या व्हिडीओ कॉलमध्ये त्यानं महिलेसमोरच अश्लील हावभाव व चाळे केल्याचा खळबळजनक दावा पीडित महिलेनं केला आहे

आरोपीनं होत असलेल्या या त्रासामुळे महिलेनं आपण मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती पोलिसांनी दिली. अखेर महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार डोंगरी पोलिसांनी आरोपी युसूफ रंगवाला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतू, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील डोंगरी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आता आरोपीविरोधातला कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह डेटा तपासला जाण्याची शक्यता आहे.

एका महिलेकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यावर अशाप्रकारे करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे विरोधकांना टीकेसाठी आयते कोलित मिळाल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT