Filipe Nery Rodrigues, Praful Patel Sarkarnama
मुंबई

भाजपला धक्का : माजी मंत्र्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मागील तीन दिवसांत दोन माजी मंत्र्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.

सरकारनामा ब्युरो

गोवा : एकमेव आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सत्ताधारी भाजपला धक्का दिला आहे. सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या नेत्यानं दुपारी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. त्यांना गोव्यातील (Goa) वेलिम मतदारसंघातून विधानसभेचं तिकीटही देण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज (Filipe Nery Rodrigues) यांच्या रुपाने भाजपला (BJP) सहावा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत तीन मंत्र्यांसह सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. नेरी यांनी गुरूवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांतर दुपारी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला. ते दक्षिण गोव्यातील वेलिम (Velim) विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

राष्ट्रवादीकडून नेरी यांना वेलिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. वेलिम यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे ते काही दिवसांपासून नाराज होते. ते राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. नेरी यांच्या ऐवजी भाजपने पत्रकार सॅविओ रॉड्रिग्ज यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. जुलै 2019 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या 10 आमदारांपैकी फिलिप हे एक होते.

राष्ट्रवादीची ताकद वाढली

दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री फ्रान्सिस्को मिक्की पाचेको यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ते आधी राष्ट्रवादीमध्ये होते. त्यामुळे त्यांची घरवापसी झाली आहे. तर गुरवारी नेरी यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली आहे. दोघांनाही पक्षाने विधानसभेचे तिकीट दिले आहे.

भाजपला अनेक धक्के

राज्यात भाजपला गळती लागल्याचे चित्र असून, आतापर्यंत सहा आमदारांनी पक्ष सोडला आहे. मायकल लोबो, पाऊसकर आणि फिलिप या मंत्र्यांनी पक्ष सोडला आहे. याचबरोबर प्रवीण झांटे यांनीही आमदारकीची राजीनामा दिला आहे. प्रवीण झांटे हे राज्यातील मोठे उद्योगपती आहेत. अलिना सलडान्हा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे. त्यांच्यानंतर कार्लोस अल्मेडा या भाजप आमदाराने राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनीही भाजप सोडत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Goa Political News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT