Ashish Shelar, Raj Thackeray And Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Ashish Shelar: ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी ...;ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाजपचा हल्लाबोल

Ashish Shelar’s Scathing Remarks on Thackeray Unity:महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली... ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता.

Mangesh Mahale

मराठीच्या मुद्दांवर राज-उद्धव ठाकरे व्यासपीठावर एकत्र आहे, ते यापुढेही एकत्र असतील, अशी ग्वाही खु्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या विधानानंतर मनसेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती नक्की होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरुन भाजपने त्यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यास सुरवात केली आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी 'एक्स'वर दोन्ही भावांच्या एकत्र येण्यावर खिल्ली उठवली आहे. महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार... त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे, असा टोला लगावला आहे.

महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली... ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता, असा टोमणा शेलार यांना हाणला आहे. भाषेसाठी नाही ही तर.. निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी , असे त्यांनी म्हटलं आहे.

"भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच...आणि ते यांच्या लेखी नाहीच ! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार करण्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे..निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब"तहात" जिंकण्याचा प्रयत्न," अशा शब्दात शेलार यांनी दोन्ही ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

भाजपचे आमदार परिणय फुके यांनी जोरदार टीका केली. "विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधुंचा दारुण पराभव झाला आहे. दोन्ही सेनेचे अस्तित्व आता राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना आता एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. खरेतर ठाकरे बंधू यांनी विजयी मेळावा घेण्याऐवजी आभार सभा घ्यायला हवी होती," असे फुके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT