मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तेव्हा सुपारी घेऊन बोलल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मान्य केले. मात्र, पवार यांनी त्या सुपारीची किंमत सांगावी, असे आव्हान करून भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.
राज यांच्या नव्या भूमिकेवरून शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये रोजच कलगीतुरा रंगत आहे. त्यात राज यांच्यावरील टिकेचा मुद्दा उचलून शेलारांनी पवारांना लक्ष्य केले आहे.
शेलार म्हणाले की, या सरकारला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे. त्यातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या आहेत. सरकारमधील लोकांविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होत आहे. बाबरी पाडण्याच्या मुद्दयावरूनही शेलारांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेना राम मंदिराच्या विषयात अदखलपात्र आहे. वस्तुस्थितीसाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे शिकवणी लावावी. शिवसेनेचा कार्यक्रम म्हणजे आयत्या बिळावर नागोबा अशी स्थिती आहे, अशा शब्दात शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
अजित पवार पहाटेच्या वेळी कोणाची सुपारी घेऊन आले होते
भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्यावर आरोप करणारे पवार हे पहाटेच्या वेळी कोणाची सुपारी घेऊन आले होते, असा प्रश्न विचारून राणे यांनी पवारांना डिवचले. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याला कोणीच किंमत देत नाही. उपमुख्यमंत्री म्हणून काय आणि कसे बोलावे हे त्यांनाच कळत नसल्याचा टोलाही राणेंनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.